माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला सहकार्य करा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

0
208
Advertisements

चंद्रपूर – राज्यात वाढणारा कोरोनाचा प्रसार व मृत्युदर कमी करण्यासाठी शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबविले आहे.
15 सप्टेंबर पासून 25 ऑक्टोबर पर्यन्त ही मोहीम जिल्ह्यात सुरू राहणार आहे.
या मोहिमेमध्ये एकूण 1967 पथक तयार करण्यात आले आहे, प्रत्येक पथकात 1 आशा स्वयंसेविका, व 2 स्वयंसेवकांचा समावेश राहणार आहे, ग्रामीण भागात 1747, शहरी भागात 109 तर महानगरपालिका क्षेत्रात 111 चमू कार्यरत राहणार आहे.
ही मोहीम 2 टप्प्यात असणार आहे, घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
प्रत्येक 10 चमूमागे 1 वैधकीय अधिकारी असणार असून प्रत्येक पथकाला थर्मल स्कॅनर, प्लस ऑक्सिमिटर, रेफरल बुक, मास्क सॅनिटायझर पुरविण्यात आले आहे.
प्रत्येक चमूचे योग्यरीत्या प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक चमू दररोज 50 कुटुंबाची तपासणी करणार आहे.
या मोहिमेद्वारे नागरिकांची तपासणी करून जर त्यांच्यामध्ये लक्षण आढळली तर त्यांना कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात येणार, या मोहिमेला नागरिकांनी प्रतिसाद देत सहकार्य करण्याची विनंती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here