चंद्रपूर – चंद्रपूर शहरात खाजगी 700 बेडच्या जम्बो हॉस्पिटलला परवानगी मिळाल्यावर सध्या प्रशासनावर ताशेरे ओढल्या जात आहे, कारण शासकीय यंत्रणा संपूर्णतः ढिसाळ नियोजनाने खाजगी यंत्रणेसमोर अयशस्वी ठरली.
शासनाला नागरिकांच्या आरोग्यसंबंधी नियोजन करण्याचा भरपूर वेळ मिळाला होता परंतु कोरोना महामारीत जाणूनबुजून योग्य पाऊले उचलल्या गेली नाही त्याचा सर्व परिणाम आज जिल्ह्यातील कोरोनाचा 8 हजारी आकडा होय.
महत्वाची बाब म्हणजे या खाजगी हॉस्पिटलची संकल्पना नागपुरातील हॉटेल व्यावसायिकांची आणि त्याला साथ कांग्रेस भाजपची म्हणजे आज चंद्रपूरकरांचे आरोग्य हॉटेल व्यावसायिकांच्या हातात असणार आहे, पुण्यातील मोठ्या शहरात शासकीय जम्बो हॉस्पिटल उभे राहू शकते परंतु चंद्रपुरात का नाही? कारण इथले राजकारणी फक्त आपला स्वार्थ बघत आहे, नागरिकांच्या आरोग्यप्रति शासन गंभीर नाही असा थेट आरोप आम आदमी पक्षाच्या पारोमिता गोस्वामी यांनी प्रशासनावर लावला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.
एका हॉटेलमध्ये हॉटेल व्यवसायिक बैठक घेत सर्व नियोजन करतो व नंतर 2 दिवसात 700 बेडचा प्रस्ताव महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन समोर येत तात्काळ त्याला मंजुरी देण्यात येते मग शासकीय यंत्रणेला ही जबाबदारी का देण्यात आली नाही, कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी प्रशासनाकडे डॉक्टर उपलब्ध होत नाही जे आहे ते ट्रेनिंग घेत असलेले डॉक्टर्स रुग्णांची देखरेख करीत आहे, पण खाजगी हॉस्पिटलला मात्र डॉक्टर्स, स्टाफ सर्व उपलब्ध होते म्हणजे हा संपूर्ण खेळ नागरिकांच्या आरोग्याचा मांडला आहे, यावर प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलावी व शासकीय जम्बो कोविड हॉस्पिटल उभारून सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे.
चंद्रपूरकरांचे आरोग्य हॉटेल व्यासायिकांच्या हाती – पारोमिता गोस्वामी
Advertisements