चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना स्थिती व होणारे राजकारण

0
734
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बाधित हा 2 मे ला मिळाला होता, त्यावेळेस बाधित संख्या ही नियंत्रित होती परंतु आज 4 महिन्यानंतर ही संख्या 8 हजरांच्या वर गेली.
राज्यात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता परंतु त्यावेळेस मात्र चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव सुद्धा झाला नाही, यासाठी खुद्द मुख्यमंत्री यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांचं कौतुक केलं होतं.
परंतु आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, देशात 50 लाखांच्या वर बाधितांचा आकडा पार झाला, उपचार घेत असलेल्या बाधितांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.
ती पूर्ण करण्यास प्रशासन हतबल ठरत आहे, पुढचा काळ कसा असेल याबाबत आजच चित्रच सांगून जात आहे, इतकं होत असताना सुद्धा प्रशासन नियोजन करण्यात अयशस्वी ठरले.
चंद्रपूर जिल्ह्यातील मृतकांच्या आकड्याने शंभरी पार केली, जिल्ह्यातील नागरिकांना बेडची कमतरता भासत आहे, त्यासाठी शासनाने तात्काळ जम्बो हॉस्पिटलची निर्मिती करायला हवी होती परंतु ते काम सुद्धा आता खाजगी डॉक्टर्स करणार, त्यासाठी त्यांनी 700 बेडचे खाजगी जम्बो हॉस्पिटल सुरू करीत आहे.
पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आधीच नागरिकांच्या आरोग्याबद्दल गंभीर असायला हवे होते पण तसे काही घडले नाही.
उलट नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती निर्माण झाली, महत्वाची बाब म्हणजे 700 बेडच्या जम्बो हॉस्पिटल सुरू होत आहे हे सुद्धा कुणाला माहीत नव्हते, नागरिकांना कळल्यावर काही विरोध झाला परंतु राजकीय पक्ष मात्र मृग गिळून गप्प बसले. प्रशासनाकडे डॉक्टर्स, कर्मचारी यांची कमतरता आहे, खाजगी डॉक्टर्स आपली सेवा देत नाही आहे परंतु खाजगी हॉस्पिटलसाठी मात्र तेच डॉक्टर्स आपली सेवा देण्यास तयार आहे.
आता हे अपयश झाकण्यासाठी 25 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोम्बरपर्यंत जनता कर्फ्यु नागरिकांवर लादण्यात येत आहे, मागच्या जनता कर्फ्युत रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली यंदा काय होणार हे कुणालाही माहीत नाही.
राज्यातील विरोधी पक्ष म्हणून भाजप आपली भूमिका ठामपणे मांडत आहे परंतु चंद्रपुरात मात्र हे चित्र उलट आहे.
या खाजगी जम्बो हॉस्पिटलला पालिकेद्वारे मान्यता देण्यात आली व आता स्वतः भाजप जिल्हाध्यक्ष, महापौर व शहर अध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत 1000 बेडचे जम्बो हॉस्पिटल तात्काळ बनवावे असे निवेदन दिले, म्हणजेच स्वतः खाजगी जम्बो हॉस्पिटलला परवानगी द्यायची व नंतर आम्ही नागरिकांच्या बाजूने असल्याचा भास करायचा हे तर नियोजित राजकारणाचा भाग आहे.
जिल्ह्यातील बाधित 8 हजारांच्या वर जात असताना त्यावेळी हे शहाणपण भाजपला का सुचले नाही? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे.
आमदार जोरगेवार यांनी खाजगी जम्बो हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी 50 टक्के बेड आरक्षित करण्याची मागणी केली होती मात्र आढावा बैठकीत त्या मागणीचा साधा उल्लेख पण करण्यात आला नाही.
सध्या उत्तम नियोजन व आरोग्याविषयीच्या नागरिकांच्या गरजा कश्या पूर्ण करता येईल हे महत्त्वाचे होते परंतु पालकमंत्री स्वतः आपल्या विधानसभा क्षेत्रात सुशोभीकरनासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करीत आहे.
महत्वाची बाब म्हणजे या सर्व ढिसाळ नियोजनाचा विरोध फक्त आम आदमी पक्ष व जनविकास सेनेने केला बाकी सर्व पक्ष गप्प बसले.
इतकी हतबलता का बाकी पक्ष हे नागरिकांच्या आरोग्यप्रति गंभीर नाही हे यावरून स्पष्ट झाले.
चंद्रपूर करांनो चांगलं आरोग्य, उपचार हवे असेल तर आपण यावर आवाज उचलायला हवा.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु परंतु या 7 दिवसांच्या जनता कर्फ्युत हातावर काम करणाऱ्यांचे काय? आधीच कोरोनामुळे कामे नसल्याने नागरिकांची मानसिकता वाईट अवस्थेत पोहचली आहे आणि आता हा 7 दिवसांचा जनता कर्फ्यु? कोरोनाची साखळी या जनता कर्फ्युत तुटणार का हा मोठा अनुत्तरीत प्रश्न आहे.

Advertisements

प्रशासन व व्यापारी मंडळ व सर्वपक्षीय बैठकीत 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्युत नागरिकांनी बाहेर न पडावे यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झाला, 25 सप्टेंबरपासून पोलिसांतर्फे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

आधी जम्बो हॉस्पिटलची घोषणा करायची नंतर त्या घोषणेचा विसर पडायचा सध्या हेच राजकारण जिल्ह्यात सुरू आहे.
निवडणुकीच्या वेळी नागरिकांनी या भयावह काळातील राजकारण विसरता कामा नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here