आधी कोरोना चाचणी करा मग कार्यालयात उपस्थित व्हा !

0
290
Advertisements

चिमूर – चिमुर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत एक परिचर व ग्रामपंचायतचे रोजगार सेवक (मग्ररोहयो) विभाग यांचे कोरोना चाचणी अहवाल पोसिटीव्ह आल्याने पंचायत समितीचे कार्यालय (दि.23 ते 25 सप्टेंबर पर्यंत तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय गटविकास अधिकारी यांनी घेतला आहे.)

गटविकास अधिकारी यांचे परिपत्रक क्रमांक साप्रवि/सप्रअ/1174/2020 दिनांक 22 सप्टेंबर मध्ये म्हटले आहे की, वरील उल्लेखित कर्मचारी पोसिटीव्ह आल्यामुळे कोरोना आजाराचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता कार्यालय निर्जंतुकरण करण्याकरिता निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisements

या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांनि कार्यालयात उपस्थित राहू नये तसेच स्वतःची कोरोना विषयक चाचणी करूनच चाचणी अहवालासोबतच कार्यलयात उपस्थित राहावे असे परिपत्रकात नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here