लंपी स्किन वॉरीयर चा सत्कार

0
217
Advertisements

घोडपेठ : येथून जवळच असलेल्या मुरसा येथे लंपी आजाराने बाधित जनावरांना योग्य उपचार व लसीकरण करून लंपी आजारावर ताबा मिळवला त्यामुळे मुरसा मित्र मंडळाद्वारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांचा लंपी स्किन वॉरीयर म्हणून भव्य सत्कार करून गौरव करण्यात आला.

मागील महिन्यात जनावरांवर लंपी स्किन आजाराचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झाला होता. बाधित जनावरांना पायावर सुज, अंगाला चट्टे, धामे, नाक व डोळा गळणे या समस्यांवर डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी उपचार व लसीकरण करून रोगावर ताबा मिळवला. यामध्ये सरपंच विलास घोटकर व मुरसा मित्र मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले. डॉक्टरांनी आपले कर्तव्य पार पाडले. मात्र गावकऱ्यांनी आपली जबाबदारी समजून मुरसा मित्र मंडळाद्वारे सत्कार करून गौरव केला.

Advertisements

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सरपंच विलास घोटकर, उपसरपंच पांडूरंग खरवडे, प्रविण नांदे, सचिन पारखी, ओमप्रकाश यादव, अनिल पोटे, शंकर मत्ते, सचिन झाडे, प्रशांत ठाकरे, बापुराव घोटकर, ईश्वर नांदे, उध्दव गोहणे, अमोल बरडे, पंकज ठाकरे, राजु गणफाडे, अमोल पारखी, मंगेश देवूळकर, शंकर पोटे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here