700 खाटांच्या जम्बो हॉस्पिटल बद्दल गौप्यस्फोट

0
332
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णासाठी बेड उपलब्ध नसल्यामुळे उपचाराअभावी अनेक रूग्णांचे हाल होत आहेत. सहा महिन्यांपासून संक्रमण सुरू झालेले आहे मात्र चंद्रपूर शहर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही. महिन्याभरात संक्रमनाने वेग घेतला. मात्र शासकीय यंत्रणा व महानगरपालिका उपचाराच्या सुविधा निर्माण करण्यात सपशेल अपयशी ठरलेली आहे.अशातच महानगरपालिकेचे काही अधिकारी व जिल्ह्यातील काही राजकीय नेते जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कोरोना आपत्तीचा लाभ घेण्यासाठी नियोजन करण्यात व्यस्त आहेत. कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शकुंतला फार्म येथे 700 खाटांचे खाजगी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयाला विरोध करण्याचे कारण नाही.
मात्र या रुग्णालयांमध्ये मनपाचे अधिकारी,जिल्ह्यातील नेते व काही व्यावसायिक यांची संयुक्त भागीदारी असल्याची चर्चा सुरू आहे.या रुग्णालयाला परवानगी देताना सुद्धा मनपाने मोठी तत्परता दाखविली व अनेक नियम पायदळी तुडवले. मात्र हीच तत्परता सर्वसामान्य रुग्णांसाठी शासकीय दवाखान्यांमध्ये उपचाराच्या सुविधा निर्माण करण्यात मनपा व जिल्हा प्रशासनाने दाखवलेली नाही. त्यामुळे एकूणच जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असून सर्वसामान्य जनतेमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे.सर्वसामान्य
रुग्णांचे हाल होत असताना अशा प्रकारच्या संशयास्पद भूमिका घेतल्याने मनपाची प्रतिमा वेशीला टांगल्या गेली.हे मनपाचे मोठे अपयश असल्यामुळे आत्मक्लेश करण्यासाठी उद्या दिनांक 23 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेचे नगरसेवक जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख दुपारी 12 वाजता पासून चंद्रपूर शहर महानगरपालिका समोरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ दिवसभर “आत्मक्‍लेश आंदोलन” करणार आहेत.या वेळी जन विकास सेनेचे सर्व कार्यकर्ते आपल्या घरासमोर किंवा शहरातील थोर पुरूषांच्या पुतळ्यासमोर बसुन आत्मक्लेश आंदोलन करीत या आंदोलनामध्ये सहभागी होतील. गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येकाला उपचाराची सुविधा मिळणे हा मूलभूत हक्क असून या हक्कासाठी जन विकास सेना आता मैदानात उतरणार आहे.या आंदोलनादरम्यान पप्पू देशमुख सातशे खाटांच्या कोविड हॉस्पिटल बद्दल गौप्यस्फोट सुद्धा करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here