अँटिजेन चाचणी केंद्र सुरू करा – सभापती चौधरी यांची मागणी

0
284
Advertisements

घुग्गुस – जिल्ह्यात कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना नागरिकांच्या चाचण्या जास्त करण्याबाबत आरोग्य विभाग भर देत आहे परंतु घुग्गुस मध्ये मात्र अँटिजन टेस्ट बंद करण्यात आली आहे.
आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही चाचणी सुरू होती परंतु चाचणी करणारे कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने अँटिजेन चाचणी बंद करण्यात आली.
घुग्गुस शहरातील नागरिकांना अँटिजेन चाचणी करण्याकरिता चंद्रपूरला जावे लागत आहे, याकरिता पुन्हा अँटिजेन चाचणी घुग्गुस शहरात सुरू करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती नितु चौधरी यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.

घुग्गुस शहरात झपाट्याने कोटोणाबधितांची वाढ होत आहे, बाधितांचा आकडा 100 च्या वर पोहचला असताना सुद्धा अँटिजेन चाचणी केंद्र बंद आहे तरी ते तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here