विक्की गुप्ता/प्रतिनिधी
घुग्गुस – एका भाजी विक्रेत्याला ग्राहकाने 100 रुपयांची नकली न दिल्याने चांगलीच खळबळ उडाली.
ती 100 रुपयांची नोट ही खऱ्या नोट सोबत हुबेहूब मिळते परंतु त्या खोट्या नोटांचा कागद मात्र पातळ व त्यात असणारी सिल्व्हर पट्टी ही सुद्धा खोटी आहे अशी माहिती त्या भाजी विक्रेत्याने न्युज 34 च्या प्रतिनिधी सोबत बोलताना व्यक्त केली.
ही नोट चलनात आली आहे, एक नोट भेटली परंतु अश्या कितीतरी नोटा चलनात आल्या तर हाहाकार माजेल म्हणून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून या मागे असणाऱ्या सुत्रधाराला पोलिसांनी पकडावे अशी मागणी होत आहे.
लॉकडाऊन काळात नागरिक इंटरनेट च्या युगात पोहचले आहे, त्या जगात कोणती वस्तू कशी बनवायची याबद्दल माहिती असते, कुणीतरी ही नोट बनविण्याची पद्धत घरी बसून किंवा त्या नोटांची xerox मारून बनवली असेल हा संशय नागरिकांकडून वर्तविल्यात जात आहे.