Advertisements
चंद्रपूर – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव बघता शहरात पुन्हा जनता कर्फ्यु होणार यासंदर्भात नियोजन भवन येथे पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे.
बैठकी आधी काही पक्षांनी जनता कर्फ्युला विरोध दर्शविला मात्र बैठकीत सर्व जनता कर्फ्युच्या समर्थनात बोलायला लागले.
हा जनता कर्फ्यु 7 ते 14 दिवसांचा असू शकतो, सर्वांनी एकमुखाने या कर्फ्युला संमती दिली आहे.
जनता कर्फ्युला सध्या नागरिकांचा काही प्रमाणात विरोधच आहे, जनता कर्फ्यु घोषित झाल्यास पुन्हा सर्व सामान्य नागरिकांच्या खिश्याला कात्री व हातावर काम करणारे पुन्हा बेरोजगार, कोरोनाने तर नंतर मरणार आधी भुकेने मरू अशी भावना जनसामान्यांत व्यक्त होत आहे.