ब्रह्मपुरी पोलिसांनी केली आमिर खान ला अटक

0
1007
Advertisements

ब्रह्मपुरी – ब्रह्मपुरी पोलिसांना 20 सप्टेंबरला गोपनीय माहिती मिळाली असता शहरात काही इसम मोटारसायकल द्वारे दारूची वाहतूक करणार आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत डीबी पथकाचे खोब्रागडे, अजय नागोसे व कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी केली.
पहाटे 3 वाजताच्या सुमारास 3 मोटारसायकल येताना आढळले असता पोलिसांनी त्यांना अडवीत चौकशी केली, त्यामध्ये देशी दारूच्या 6 बॉक्स एकूण 18 पेट्या मिळाल्या.
पोलिसांनी अवैध दारूची वाहतूक करणारे 4 आरोपीना ताब्यात घेत 3 मोटारसायकल, 4 मोबाईल जप्त करीत एकूण मुद्देमाल किंमत 3 लाख 56 हजार जप्त केला.
आरोपीमध्ये 25 वर्षीय आमिर खान, 22 वर्षीय कासीम शेख, 21 वर्षीय समीर डोंगे व 20 वर्षीय जतीन मूलमुळे यांच्यावर गुन्हा नोंद करीत अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here