भाजपतर्फे 10 हजार मास्क व सॅनिटायजरचे वाटप

0
161
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची अर्धांगिनी सौ.सपनाताई मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात 1लाख 51हजार मास्कचे वाटप करण्यात येत असतानाच याच पार्श्वभूमीवर कोरपना शहर व ग्रामीण भागात 10 हजार मास्क व सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले.कोरपणा येथे भाजी व फळांची दुकाने,अॅटो चालक, हमाल,दुचाकी चालक व इतरांना मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी कोरपणा तालुका भाजपाध्यक्ष तथा कन्हाळगावचे उपसरपंच नारायण हिवरकर,पुरुषोत्तम भोंगळे,नगरसेवक अमोल आसेकर,जगदीश पिंपळकर पिपर्डा,प्रभाकर राठोड,बंडू गोंडे तसेच भाजप पदाधिकारी,कार्यकर्त्यांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here