दुर्गम भागासठी मोबाईल रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून द्या

0
170
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या दुर्गम आदिवासी नक्षल भागात अजूनही आरोग्य सेवा आवश्यकतेनुसार दारापर्यंत पोहोचली नसून कित्येक गुडे-पाडे विकासापासून दूर आहे.दळणवळणाची व्यवस्था व वाहन सुविधा नसल्याने अनेकदा उपचारा अभावी रुग्णांनी जीव गमवले आहे.ग्रामीण रुग्णालयात शासनाची 108(एम्बुलेन्स) रुग्णांना वेळेवर उपलब्ध होत नाही.हे वास्तव असताना 108 वाहन,कोविड 192 सेवेत असल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे.आदिवासी भागात हल्ली डेंग्यू-मलेरियाने अक्षरशः थैमान घातले असून या आजाराची गावागावात वाढती रुग्ण संख्या व शहरी सह ग्रामीण भागात पसरत असलेला कोरोना नागरिकांना चिंताजनक ठरत आहे.याच बरोबर अनेक अपघात व गंभीर आजार असलेल्या रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने मोठ्याप्रमाणात गैरसोय व योग्यवेळी उपचार मिळत नसल्याने दुर्गम,आदिवासी भागात जलद गतीने उपचार उपःलब्ध करून देण्यासाठी कोरपना तालुक्यातील रूपापेठ व जिवती तालुक्यातील वणी(बु)ग्रामपंचायतींना खनिज विकास निधीतून आयुष्यमान आरोग्य उपकेंद्रात मोबाईल रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सैय्यद आबीद अली यांनी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here