गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” च्या पार्श्वभूमीवर चीन पुरस्कृत कोरोना नामक राक्षसाने अख्ख्या जगाला वेठीस धरले आहे.याचा फैलाव रोखण्यासाठी कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेऊन 17 गुरुवार ते 20 सप्टेंबर रविवार पर्यंत अशी चार दिवसीय जनता कर्फ्यूची हाक दिली होती.याला शहरवासीयांनी पहिल्या दिवसापासून उत्स्फूर्तेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला.सर्व लहानमोठ्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेऊन 100 टक्के प्रतिसाद दिला.तालुक्यातील शासकीय कार्यालय व व्यापारी वर्गासह ग्रामीण भागात कोरोनामुळे कमालीची दहशत पसरली आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कर्फ्यूची काही प्रमाणात का होईना पण मदत मिळाली आहे हे मात्र विशेष.
या जनता कर्फ्यूमधे मेडिकल,दवाखाने वगळण्यात आले होते.व्यापारी असोशियनने स्व:ताचे नुकसान न बघता जनतेच्या आरोग्यासाठी “जनता कर्फ्यु” ची हाक दिली असता शहरातील सर्वपक्षीय नेते, एसडीपीओ, ठाणेदारांसह समस्त पोलिस कर्मचारी, न.प.मुख्याधिकारी, नगराध्यक्ष,उपाध्यक्ष,सभापती तथा सर्व नगरसेवक,सर्व पत्रकार बंधू,लहानमोठे व्यापारी तथा गडचांदूरकरांनी सदर जनता कर्फ्यूला कौतुकास्पद प्रतिसाद दिल्याबद्दल गडचांदूर व्यापारी असोसिएशनच्या वतीने या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले.
गडचांदूर शहरातील चार दिवसीय “जनता कर्फ्यू” ला विराम
Advertisements