चंद्रपुरात मागील 24 तासात 292 बाधितांची भर

0
329
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 7816 झाली आहे. यापैकी 4484 बाधित बरे झाले आहेत तर 3218 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

रविवारी एकूण 292 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 5 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
ज्यामध्ये तुकुम, चंद्रपूर येथील 59 वर्षीय महिला, तुकूम येथील 50 वर्षीय पुरुष, वडगाव चंद्रपूरातील 47 वर्षीय पुरुष, वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष व पंचशील चौक चंद्रपूर येथील 66 वर्षीय बाधितांचा मृत्यू झाला. सर्व मृतक बाधितांना कोरोनासह, न्यूमोनियाचा आजार होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 107 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here