चंद्रपुरात 700 खाटांचे जम्बो खाजगी हॉस्पिटल, कोरोनाचा आजार बनला बाजार

0
162
Advertisements

चंद्रपूर – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता रुग्णालयात बेड उपलब्ध नाही, रुग्ण पूर्णतः वाऱ्यावर आहे, कोरोना बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे, अनेक बाधित मृत्यूच्या उंबरठ्यावर आलेले आहे.
यावेळेस आरोग्याबाबत योग्य नियोजन शासनाद्वारे करायला पाहिजे परंतु चंद्रपुर शहरातील शकुंतला फार्म येथे 700 बेडचे खाजगी रुग्णालय उभे राहणार आहे.
या 700 बेडच्या रुग्णालयाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, महत्वाचे म्हणजे या 700 बेडच्या रुग्णालयाचा खर्च सामान्य माणसांच्या खिश्याला न परवडणारा आहे, बोलायचं म्हणजे या रुग्णालयात फक्त श्रीमंत नागरिकांचा उपचार होणार सामान्य नागरिकांचा उपचार हा शासकीय रुग्णालयात कोंबून होणार आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने उचित नियोजन करायला हवे, मेडिकल कॉलेज नवीन इमारत, लॉन, खाजगी सभागृहे असे अनेक विकल्प समोर असताना सुद्धा प्रशासन मात्र जनता कर्फ्यु, माझे कुटुंब माझी जबाबदारी यामध्येच व्यस्त आहे.
महत्वाची बाब म्हणजे या खाजगी जम्बो रुग्णालयाचे भागीदारी जिल्ह्यातील एक मोठा नेता, प्रशासनिक अधिकारी व काही व्यापारी यांच्यामध्ये आहे.
हा विषाणू श्रीमंत नागरिकांनी देशात आणला तर उपचार आधी त्यांच्यावर व्हायला हवे म्हणून कदाचित हे जम्बो रुग्णालय उभे राहत आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे जिल्ह्यातील एकाही राजकीय पक्षांचे लक्ष नागरिकांना योग्य उपचार मिळावा याकडे मुळीच नाही, जनता कर्फ्युची बैठक आहे सर्व पक्षांना यायचं तर त्याठिकाणी सर्व जमा होणार परंतु या कोरोनाने नागरिकांचा जीव गेला तरी चालेल आम्ही तुमच्यासाठी बाहेर पडणार नाही अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतली आहे.
म्हणूनच आता सर्वांनी स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here