गडचांदूरात “जनता कर्फ्यू” ला अभूतपूर्व प्रतिसाद

0
109
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चीन पुरस्कृत कोरोना नामक राक्षसाने अख्ख्या जगाला वेठीस धरले आहे.याचा फैलाव रोखण्यासाठी कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेऊन 17 गुरुवार ते 20 सप्टेंबर रविवार पर्यंत अशी चार दिवसीय जनता कर्फ्यूची हाक दिली होती.याला शहरवासीयांनी तिसर्‍या दिवशीही उत्स्फूर्तेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला.पहिल्या दिवसापासूनच लहानमोठ्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेऊन 100 टक्के प्रतिसाद दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.तालुक्यातील शासकीय कार्यालय व व्यापारी वर्गासह ग्रामीण भागात कोरोनामुळे कमालीची दहशत पसरली आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सदर बंदची हाक व्यापारी असोसिएशनने दिली होती.यात मेडिकल,दवाखाने वगळण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here