चंद्रपूर@7524 24 तासात 245 बाधितांची जिल्ह्यात भर

0
225
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 7524 झाली आहे. यापैकी 4281 बाधित बरे झाले आहेत तर 3134 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

शनिवारी एकूण 245 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 4 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
ज्यामध्ये दादमहल वॉर्ड येथील 55 वर्षीय पुरुष, बेळपाटळी येथील 49 वर्षीय पुरुष, संजय नगर चंद्रपूरातील 50 वर्षीय पुरुष, बंगाली कॅम्प चंद्रपूर येथील 66 वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला. सर्व मृतक बाधितांना कोरोनासह, न्यूमोनियाचा आजार होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 102 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here