जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात तातडीने सिटी स्‍कॅन मशिन उपलब्‍ध करावी

0
80
Advertisements

चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालयांतर्गत येणा-या जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णलयात तातडीने सिटी स्‍कॅन मशिन उपलब्‍ध करण्‍याच्‍या मागणीसाठी चंद्रपूर महानगर भाजपाचे अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांची भेट घेत निवेदन सादर केले.

यावेळी जिल्‍हाधिका-यांशी झालेल्‍या चर्चेत डॉ. मंगेश गुलवाडे म्हणाले चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालयांतर्गत येणा-या जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णलयात फक्‍त एक सिटी स्‍कॅन मशिन कार्यरत आहे. कोविड-19 मुळे वाढती रुग्‍ण संख्‍या लक्षात घेता या एका मशिनवर तान पडत आहे. या रुग्‍णालयात चंद्रपूर व गडचिरोली जिल्‍हयातील रुग्‍ण येतात. त्‍यामुळे सदर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय तातडीने एक सिटी स्‍कॅन मशिन आवश्‍यक मनुष्‍यबळासह उपलब्‍ध करण्‍यात यावी. जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांनी याबाबत सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन शिष्‍टमंडळाला दिले. शिष्‍टमंडळात उपमहापौर राहुल पावडे, भाजयुमो चंद्रपूर अध्‍यक्ष तथा नगरसेवक विशाल निंबाळकर, मनपा सदस्‍य सुभाष कासनगोट्टूवार, पुरुषोत्‍तम सहारे, दत्‍तप्रसन्‍न महादाणी यांची उपस्थिती होती.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here