नांदाफाटा परीसर कोरोनाचा नविन हाॅटस्पाट

0
198
Advertisements

गणेश लोंढे / नांदा फाटा
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून आकडा झपाट्याने वाढत असून नांदा शहरात आज पर्यंत कोरोना रुग्णांनी 20 चा आकडा पार केला आहे.
आज आलेल्या आकडेवारी नुसार आज 8 कोरोना पोसिटीव्ह रुग्णांचा समावेश असून नांदा फाटा येथील तीन खाजगी डॉक्टरांचा समावेश असुन त्यांचे कुटुंबातील आणि हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
स्थानिक नांदा ग्रामपंचायत प्रशासनाकडून श्रीवास्तव कॉलनी कडे जाणारा मार्ग सील करण्यात आला असून तिनही डॉक्टरांचे हॉस्पिटल बंद करून कटेंटमेंट झोन घोषित केले आहे नांदा ग्रामपंचायत कडून नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वारंवार सूचना देत असल्या तरी रस्त्यावर भरणारी गुजरी व नागरिकांकडून होत असलेली वर्दळ कोरोनाचा उद्रेक वाढविणारी आहे.

नांदाफाटा परिसरातील अनेक नागरिक या तीनही डाॅक्टरांकडे उपचार करीत होते या डॉक्टरांना रुग्णांकडूनच कोरोनाची लागण झाली आहे शासनाकडून अद्याप या डॉक्टर जवळ उपचार घेणाऱ्या रुग्णांची कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करून तपासणी झालेली नाही नांदा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात तापाचे रुग्ण असून या सर्वांची कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे सोमवारपासून पाच दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात येत आहे येथील तीनही डॉक्टरांना कोरोना झाला असल्याने स्थानिक वैद्यकीय आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याने येथील अल्ट्राटेक कंपनीच्या रुग्णालयांमध्ये स्थानिक परिसरातील आजारी नागरिकांचा उपचार करण्याची व्यवस्था पालकमंत्री जिल्हाधिकार्यांनी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here