त्या पोलीस योध्यावर अवैध दारू विक्रेत्यांचा प्राणघातक हल्ला

0
157
Advertisements

चंद्रपूर – लॉकडाऊन काळात पोलिसांनी 24 तास कर्तव्य बजावले होते, नंतर जिल्ह्यात कंटेंटमेंट झोन ची वाढ झाल्याने पोलिसांवरचा ताण वाढला.
हा ताण कमी करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बंदोबस्तात पोलिसांना मदत करण्यासाठी युवकांना पोलीस योध्यांच्या स्वरूपात निवड केली.
लॉकडाऊन मधील कंटेंटमेंट झोन असो की बंदोबस्त हे पोलीस योद्धे आपली सेवा देऊ लागले.
परंतु काही काळानंतर हे योद्धे पोलीस मित्र व खबरी बनले.
शहरातील अवैध धंद्या बद्दल पोलिसांना माहिती पुरविण्याचे काम हे योद्धे करू लागले.
असाच एक प्रकार इंदिरानगर भागात घडला ज्यामध्ये अवैध दारू विक्रेता पिंटू वाढई याने पोलीस योद्धा रोहित तुराणकर यांचेवर तलवारीने हल्ला केला.
या हल्ल्यात तुराणकर यांचे आईला सुद्धा दुखापत झाली.
नागरिकांनी मध्यस्ती केल्याने वाद सुटला.
परंतु या वादात रोहित गंभीररित्या जखमी झाल्याने या प्रकरणाची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली.
पोलिसांनी तात्काळ एकाला अटक केली आहे, 1 आरोपी फरार असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

जिल्ह्यात नवीन पोलीस अधिक्षकांचे आगमन होताच अवैध धंद्यावर नियंत्रण आणण्याचे आवाहन आता त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here