सिमेंट कंपन्यातील दवाखान्यात “कोविड केअर सेंटर” सुरू करा

0
158
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” माहामारीमुळे अनेकांचे जीव टांगणीला लागले असून मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखान्यात रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे उपचारा अभावी कित्येक लोकांचे नाहक बळी जात आहे.”बेड कमी आणि रूग्ण जास्त” अशी काहीशी परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे.इतर ठिकाणांसह कोरपना तालुक्यात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या वाढत असून आजपर्यंत दोन रुग्ण मृत्युमुखी पडले आहे.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनप्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे तरीपण भविष्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे तेवढेच खरे.त्याकरीता गडचांदूर शहरात विराजमान माणिकगड व परिसरातील अंबुजा,अल्ट्राटेक सिमेंट कंपन्यांकडे त्यांच्या मालकीचे दवाखाने आहे.त्याठिकाणी बेड,डॉक्टर व स्टॉप, स्वतःची रुग्णवाहिका अशाप्रकारे पुरेपूर व्यवस्था असून जर सदर सिमेंट कंपन्यांच्या दवाखान्यात “कोविड केअर सेंटर” सुरू केल्यास भविष्यात कोरपना व जिवती तालुक्यातील कोरोना रुग्णांचा जिल्हास्तरीय ताण कमी होईल व रुग्णांना त्वरित उपचार मिळेल.यासाठी “कोविड केअर सेंटर” ची निर्मिती करावी अशी मागणी वजा विनंती कोरपना तालुका भाजपतर्फे करण्यात आली आहे.कोरपना तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे,माजी पालकमंत्री,आमदार सुधीर मुनगंटीवार,उपविभागीय अधिकारी राजुरा यांना सुद्धा निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून यावेळी गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,कोरपना तालुका भाजपाध्यक्ष तथा कन्हाळगाव उपसरपंच नारायण हिवरकर,गडचांदूर न.प.नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,माजी नगरसेवक निलेश ताजने,कोरपना नगरसेवक अमोल आसेकर,हरीश घोरे,संदीप शेरकी,रमेश मालेकर,किशोर बावणे,पुरूषोत्तम भोंगळे,अँड.पवन मोहितकर,शशिकांत आडकीने,विजय पानघाटे,ओम पवार,पद्माकर धगडी,मिनीचंद राठोड, सत्यवान घोटेकर,विनोद कुमरे आदी भाजपच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here