चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक आणि मृत्यूचे सत्र

0
126
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 7279 झाली आहे. यापैकी 4106 बाधित बरे झाले आहेत तर 3068 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

शुक्रवारी एकूण 303 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 10 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
ज्यामध्ये रामनगर परिसरातील येथील 52 वर्षीय पुरुष, भद्रावती येथील 77 वर्षीय पुरुष, पायली भटाळी, ताडोबा रोड परिसरातील चिमूर येथील 49 वर्षीय पुरुष, विचोडा चंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील 62 वर्षीय महिला, महाकाली कॉलरी परिसरातील 57 वर्षीय पुरुष, कळमना बल्लारपूर येथील 45 वर्षीय पुरुष, भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर येथील 32 वर्षीय महिला, जटपुरा गेट परिसरातील 62 वर्षीय पुरुष बाधितांचा मृत्यू झाला. सर्व मृतक बाधितांना कोरोनासह, न्यूमोनियाचा आजार होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 98 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here