चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात कांद्यावरील निर्यात बंदी केल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांची लूट हे मोदी सरकारची भूक ,कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ हटवा, शेतकरी टिकेल तर शेती पिकेल,अश्या घोषणाबाजी करत मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करून जिल्हाधिकारी साहेब यांना सव्वा किलो कांदा भेट देऊन त्यांच्या मार्फत पंतप्रधान मा .नरेंद्रजी मोदी यांना निवेदन व कांदे पाठविण्यात आले.
जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके म्हणाल्या सध्या मोठया प्रमाणात कांदा महाराष्ट्रlतील शेतकऱ्यांनी लावलेला आहे.. कांद्याला चांगला भाव मिळायला लागला होता. की लगेच भाजप सरकारने निर्यात बंदी घातली ही निर्णयात बंदी बिहार मधील निवळणूका डोळ्यासमोर ठेऊन घातली आहे हे अवघ्या देशाला माहीत आहे हे सर्व सामन्याचे सरकार नाही हे यातून स्पष्ट होते. या एका निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी केंद्रातील मोदी सरकार देशोधडीला लावला .दुष्काळ गारपीट, टंचाई, रोगराई अश्या कित्येक नैसर्गिक सामना करत असतांना शेतकऱ्याने पोटाच्या मुलाप्रमाणे सांभाळलेला पीक शेतकऱ्यांना मातीमोल भावाने विकावे लागणार आहेत. महाराष्ट्रतील शेतकरी टिकला तर शेती पिकेल कोरोनाच्या या संकटकाळात डॉक्टर, पोलीस, प्रशासकीय अधिकारी, राबतांना दिसला तो बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी रद्द करावी व शेतकऱ्याला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी या आंदोलनात उपस्थित महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके जिल्हासचिव शोभा घरडे, राणी राव, रंजना नागतोडे नीलिमा नरवडे, माधुरी पांडे, सुमित्रा वैद्य, नंदा सोनूले, स्वेता रामटेके, प्रतीक्षा अलोने व अन्य महिला उपस्थित होते.