गडचांदूर भाजपतर्फे पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस साजरा

0
191
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
देशहितासाठी अनेक कठोर निर्णय घेणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवशी गडचांदूर शहर भाजपतर्फे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून येथील ग्रामीण रुग्णालय येथे स्वयंनचलीत सॅनिटायजर मशीन देण्यात आले.भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे तथा महाराष्ट्राचे विकास पुरुष म्हणून प्रसिद्ध माजी पालकमंत्री,आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गडचांदूर शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार यांनी सदर मशीनची मागणी केली होती.मुनगंटीवार यांनी लगेच दोन मशीन उपलब्ध करून दिल्या.जनतेच्या उपयोगासाठी सदर मशीन वैद्यकीय अधिकारी डॉ.नामपल्ले यांना सुपूर्द करून लगेच कार्यांवीत सुद्धा करण्यात आली.
याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,जेष्ठ नेते महेश शर्मा,जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी सेलोकर,माजी नगरसेवक निलेश ताजने,हरीश घोरे, महादेव ऐकरे,नगरसेवक अरविंद डोहे, नगरसेवक रामसेवक मोरे,इमरान शेख,प्रतीक सदनपवार आदींची उपस्थिती होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या हितासाठी सॅनिटायजर मशीन उपलब्ध करून दिल्या बद्दल भाजप कार्यकर्ते,वैद्यकीय स्टॉपसह रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांनी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गडचांदूर भाजप महिला आघाडीतर्फे वृक्षारोपण,माझे कुटुंब माझी जबाबदारी,कोरोना मुक्त गडचांदूर मोहीम राबविण्याची शपथ घेण्यात आली.यावेळी गडचांदूरच्या माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,सौ.निता क्षीरसागर,रंजना मडावी,अँड.सौ.दीपांजली मंथनवार,सौ.सपना सेलोकर,सौ.संगीता गोरडवार आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here