पहाडावर डेंग्यूचे तांडव, आतापर्यंत दोघांचा मृत्यू

0
157
Advertisements

जिवती – जिवती तालुक्यातील दुर्गम कोलाम आदिवासी जमातीचे धनक देवी कारगाव खुर्द या गावात मलेरिया डेंगू आजाराने गावकरी त्रस्त असून पंधरा दिवसापूर्वी गावाच्या त्रस्त आजाराची कल्पना गटविकास अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती मात्र आवश्यक ती उपाययोजना रक्त तपासणी फवारणी उपचार याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कोलाम समाज वस्तीतील 14 वर्षे वयाची कनिबाई तर  कारगाव खुर्द येथील सहाव्या वर्गाची विद्यार्थिनी लक्ष्मी मडावी वय बारा वर्ष त्यांचा गेल्या आठवड्यात डेंगू मलेरिया मृत्यू झाला धनक देवी येथील लालीबाई आत्राम रमेश आत्राम हे मृत्यूशी झुंज देत आहे.

ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे भरती करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले गावामध्ये चिंतेचे वातावरण असून गावभर आजाराने अनेक रुग्ण त्रस्त आहे जिवती तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ढिसाळ कारभारामुळे डोंगर पायथ्याशी असलेल्या या गावाकडे दुर्लक्ष होत आहे आरोग्य कर्मचारी गेल्या एक आठवड्यापासून या गावाला फिरकून कुणीही पाहिलेले नाही यामुळे तातडीने या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर व रक्त तपासणी फवारणी उपक्रम राबविण्यात यावा 17 तारखेला भ्रमणध्वनीवर संबंधितांक कडे संपर्क करण्याचा प्रयत्न झाला मात्र क्षेत्राबाहेर असल्याने संपर्क होऊ शकला नाही तातडीने धनकदेवी कारगाव खुर्द येथे उपचाराची व्यवस्था करावी उपचाराअभावी कोणत्याही कोलाम आदिवासींचा उपचाराअभावी मृत्यू होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी केली असुन ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन रुग्णा शी विचारपुस केली मात्र डॉ पुरी प्रयत्न करीत असुन लाली बाई व रमेश यांची प्रकृती अत्यंत चितांजनक असल्या ने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयास पाठविण योग्य असल्याचे सांगीतल्याने त्याना चन्द्रपुर येथे रवाना केले मात्र गावात दोन तरूणीचा मुत्यु झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे अत्यंत गरीब कुंटूब असल्याने त्याचे आर्थीक अडचणीमुळे खाजगी उपचार करण कठीण आहे कारगाव येथिल सिडाम याची मलेरियाने प्रकृती खाला विल्या ने चन्द्रपुर येथे खाजगी रुग्णालयात रात्रोला भरती करण्यात आले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here