चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरुचं

0
112
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 6976 झाली आहे. यापैकी 3836 बाधित बरे झाले आहेत तर 3045 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

गुरुवारी एकूण 294 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
ज्यामध्ये रयतवारी कॉलरी परिसरातील येथील 40 वर्षीय पुरुष, क्राईस्ट हॉस्पिटल परिसर येथील 68 वर्षीय पुरुष, टीचर कॉलनी परिसर चिमूर येथील 45 वर्षीय पुरुष, बाबूपेठ चंद्रपूर येथील 75 वर्षीय पुरुष, अंबादेवी वॉर्ड वरोरा येथील 70 वर्षीय महिला, सहावा मृत्यू शेषनगर ब्रह्मपुरी येथील 62 वर्षीय पुरुष बाधितांचा मृत्यू झाला. काही मृतक बाधितांना कोरोनासह, न्यूमोनियाचा आजार होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 88 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here