आणि तब्बल 5 वर्षांनी त्या चिमुकल्यांना न्याय मिळाला

0
269
Advertisements

वणी (यवतमाळ) : पाच वर्षांपूर्वी वरोरा बायपास वर शालेय वाहनाला कोळशाच्या ट्रक ने जबर धडक दिली होती.

घटनास्थळी चार चिमुकल्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला होता तर पाच बालक गंभीर जखमी झाले होते. या अपघात प्रकरणी सत्र न्यायालय केलापूर यांनी महत्वपूर्ण निकाल सोळा सप्टेंबर ला दिला असून शालेय वाहन चालकला पाच वर्षे तर ट्रक चालकाला दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

Advertisements

वणी -वरोरा बायपासवर दि 18 फेब्रुवारी 2016 ला सकाळी 7.45 वाजता मॅन सुन्न करणारी घटना घडली होती. शालेय वाहन क्रमांक एम.एच.34. ए. ए. 7738 हे पीकअप वाहन दहा शालेय विद्यार्थ्यांना घेऊन मॅकरून स्टुडंट अकादमी या शाळेत जात असताना नांदेपेरा टी पॉईंट जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळशाच्या भरधाव ट्रक क्रमांक एम. एच. 34.एम. 1133 ने जबर धडक दिली यात गौरव देऊलकर, श्रद्धा हुलके या बालकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर श्रेया उलमाले व दिशा काकडे यांचा नागपूरला उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेत पाच चिमुकले विध्यार्थी जखमी झाले होते.

शालेय विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण वणी शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी जोर धरायला लागली होती. नागरिकांचा संताप अनावर होत असताना तत्कालीन ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांनी घटनेचा शिताफीने तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. तसेच या प्रकरणात शासनाच्या वतीने ऍड विनायक काकडे यांनी केस लढवावी अशी मागणी पालक व वणीकरांच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावे अशी मागणी करण्यात आली होती.

त्यामुळे शासनाने ऍड विनायक काकडे यांची नियुक्ती केली होती तब्बल पाच वर्षांनी या केस चा निकाल लागला

जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड पांढरकवडा न्यायालय यांनी दोन्ही बाजूंनी साक्ष तपासण्यात आल्या शालेय वाहन चालक गणेश बोढने यांचेवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात पाच वर्षांचा कारावास तर ट्रक चालक नियाज अहेमद याला दोन वर्षें कारावास सुनावण्यात आला आहे. या प्रकरणात सरकारच्या वतीने एड विनायक काकडे यांनी बाजू मांडली. न्यायालयाच्या या निकालाने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

त्या दुर्दैवी दिवसाची आठवण झाली की, आज ही जीव कासावीस होतो मी आणि माझे सहकारी पोलीस यांनी त्या चिमुकल्या चे शव हाताळल
पण एकदा पुन्हा हे सिद्ध झाले की जनते नि जो विश्वस पोलीस कार्यवाहीत आणि तपासावर दाखवला सहकार्य केले त्या मुळे माझे वणीचे पोलीस सहकारी यांनी आरोपी पकडणे बाबत तत्परता दाखवली.

पोलीस फक्त चागला तपास करू शकतात मात्र बुद्धीमान वकील न्याय मिळवून देऊ शकतो ते या निकालावरून सिद्ध झाले आहे विशेष सहकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेले ऍड विनायक काकडे यांनी आपले कसब पणाला लावून मरण पावलेल्या त्या चिमुकल्या ला न्याय मिळवून दिला आहे.
मुकुंद कुलकर्णी
तत्कालीन ठाणेदार, वणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here