आणि गावातील भिंतीवर अवतरले गुणाकार भागाकार

0
34
Advertisements

पोंभुर्णा – कोरोना विषाणू हा रस्त्यावर धावल्याने संपूर्ण देश थांबून गेला आज लाखो नागरिक कोरोना बाधित झाले असून सध्या अनेकांचे रोजगार बुडाले, लोकांच्या हाताला काम नाही, शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली.
ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले परंतु हे शिक्षण फक्त ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांना लाभदायक बाकी ग्रामीण भागातील मुलांकडे मोबाईल नाही, मोबाईल असला तर इंटरनेट कव्हरेज नाही यामुळे
ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित झाली आज अनेक सुशिक्षित युवकांनी गावातच मुलांसाठी शाळा सुरू केल्या ही अभिमानाची बाब आहे.
अश्यातच पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी या गावी अक्षय वाकुलकर या सुशिक्षित युवकाने गावाच्या भिंती बोलक्या केल्या, ती सुद्धा गणिताच्या सूत्रांनी एखाद्या चित्रपटाला शोभणारे हे कथानक असले तरी रियल आयुष्यात या उपक्रमाने गावातील मुलांना चांगलीच भुरळ पडली.
रोज लहान मुले येता जाता हे सूत्र वाचत असतात जेणेकरून गणिताचे सूत्र त्यांच्या लक्षात राहत आहे.
अक्षय वाकुलकर हा युवक मिशन मॅथेमॅटिकस चा संस्थापक अध्यक्ष त्यांच्या या उपक्रमाचे गावातील नागरिकांनी स्वागत केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here