सर्व शाखेतील अंतिम परीक्षा अर्ज भरण्याकरिता 15 ते 20 पर्यंत मुदतवाढ

0
135
Advertisements

चंद्रपूर : मोठ्या प्रमाणात मागील पाच महिन्यापासून कोरोना विषाणूचे सावट होते. त्यामुळे परीक्षा घ्यावयाची कि नाही. असा प्रश्न सरकारपुढे पढला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील परीक्षेचा अर्ज भरावयाचा कि नाही अशी गोंधळलेल्या परिस्थिती विध्यार्थी होते. परंतु आता शासनाने परीक्षा घेणार असे जाहीर केले. त्यामुळे आता अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले नाही. सर्व शाखेतील अंतिम परीक्षा अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ देऊन हजारो विध्यार्थ्यांना दिलासा द्या अशी मागणी एन. एस. यू. आय. जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय कुलपती व कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्याकडे केली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत 15 ते 20 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाची घडी विस्कटली आहे. लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणाहून येणाऱ्या विध्यार्थ्यांना महाविद्यालयात येऊन परीक्षा अर्ज भरणे शक्य नव्हते. त्यासोबतच विद्यापीठ व महाविद्याने आपले कामकाज बंद ठेवले होते. त्यासोबतच शासनाने परीक्षा न घेते निकाल जाहीर करण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे विद्याथ्यांनी देखील परीक्षा अर्ज भरलेले नव्हते.
परंतु आत मात्र परीक्षा घेणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. आणि अर्ज भरण्याची तारिक देखील गेली. त्यामुळे आता करायचे काय असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे पडला आहे. त्यामुळे अंतिम वर्षातील परीक्षा अर्ज भरण्याची मुदतवाढ करून तात्काळ विध्यार्थ्यांना दिलासा देण्याची महत्वपूर्ण मागणी एन. एस. यू. आय. जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांनी केली होती.
याबाबत विद्यापीठाने विध्यार्थ्यांच्या बाजूने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर विद्यार्थ्यांचा हिताकरिता आंदोलन उभारणार असल्याचा इशारा एन. एस. यू. आय. जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांनी दिला होता.
त्याची दखल घेत मुदतवाढ करण्यात आली. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here