प्रहारचा तो स्वयंघोषित जिल्हाध्यक्ष कोण?

0
106
Advertisements

चंद्रपूर – शेतकरी व सर्व सामान्यांना न्याय देण्यात नेहमी अग्रेसर असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रहार संघटना म्हणजे आताचा प्रहार जनशक्ती पक्ष राज्यात जोमाने कार्यरत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचा सर्व सामान्य कार्यकर्ता सुद्धा नागरिकांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करीत आहे.
सध्या राज्यातील काही जिल्हे वगळता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे, राज्यावरून कोरोना संकट एकदाचं टळले की कार्यकारणीचा विस्तार करण्यात येणार आहे.
परंतु चंद्रपुरात काही पद नसताना सुद्धा स्वतःला प्रहार जनशक्ती पक्षाचा स्वयंघोषित जिल्हाध्यक्ष मीच आहे असे लिखित निवेदनाचे प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात सध्या जोमात सुरू आहे.
याबाबत न्युज34 ने प्रहार जनशक्ती पक्षाचे पूर्व विदर्भ सम्पर्क प्रमुख गजू कुबडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
कुबडे यांनी सध्या कार्यकरणीचा विस्तार करण्यात आलेला नाही, कोरोनाचा काळ असल्याने सध्या पक्ष विस्ताराचे काम पुढे ढकलण्यात आले असून सध्या प्रहार सेवक जिल्ह्यात काम करीत आहे, जे प्रहार सेवक पदाचा दुरुपयोग करीत असणार त्यांच्यावर पक्ष श्रेष्ठीद्वारे कडक कारवाई करू, प्रहार हे प्रामाणिक कार्यकर्त्यांच व्यासपीठ आहे बेईमानी करणाऱ्याला यामध्ये कुठलेही स्थान नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तो स्वयंघोषित जिल्हाध्यक्ष कोण आहे यावर नागरिकांची उत्सुकता वाढलेली आहे, तो स्वयंघोषित जिल्हाध्यक्ष लवकरचं जनतेसमोर येणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here