भारत चन्ने यांची “कोरोना” वर मात

0
77
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना येथील रहिवासी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा भाजपचे जेष्ठ नेते भारत बळीराम चन्ने हे गेल्या 5 सप्टेंबर रोजी कोरोना पाझेट्यू निघाले होते.त्यांना तात्काळ चंद्रपूर येथील सिटी हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता भरती करण्यात आले.दरम्यान त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.16 सप्टेंबर रोजी त्यांना सुखरूप हॉस्पिटल मधून सुट्टी देण्यात आली.ते घरी जाण्यास निघाले असता गडचांदूर येथील सारंग पेट्रोल पम्पाजवळ भाजपाचे नगरसेवक अरविंद डोहे,माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,सुनील जोगी,प्रतीक सदनपवार,बब्लू सिंग,नारायण मेघावंशी,साईनाथ पारखी, तृप्ती पारखी,कल्पना जोगी,मदन बोरकर, अजीम बेग इत्यादी नागरिकांनी उपस्थित राहून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून अभिनंदन केले.नागरिकांचे प्रेम पाहून चन्ने हे काही क्षणासाठी भारावून गेल्याचे चित्र पहायला मिळाले.भारत चन्ने यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.उपस्थितांनी त्यांना दीर्घ आयुष्याच्या मनोकामना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here