कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता आमदार धानोरकर ऍक्शन मोड मध्ये

0
155
Advertisements

चंद्रपूर: वरोरा तहसीलमध्ये कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आरोग्य विभागाला सावध राहण्याचे व तात्पुरते रुग्णालय बांधकामासाठी 50 बेडचे नियोजन करण्याचे आदेश दिले.

वरोरा येथील कोविड सेंटरच्या संदर्भात आलेल्या तक्रारीवर त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले.

Advertisements

वरोरा विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, एसडीपीओ डॉ. निलेश पांडे, तहसीलदार सचिव गोसावी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दुधे, गटविकास अधिकारी संजय बोडिले, मुख्याधिकारी सूर्यकांत पिजदुरकर, डॉ.उमान पाटील आदी उपस्थित होते.

वरोरा शहरातील ट्रॉमा केअर सेंटरचे काम पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी योजना अंमलात आणण्याचे आदेश आमदार धानोरकर यांनी दिले. बैठकीस पंचायत समिती सभापती रवींद्र धोपटे, उपसभापती संजीवनी भोयर, बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विलास टिपले, नप गटनेते गजानन मेश्राम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here