Advertisements
चंद्रपूर : दुचाकी वाहनासाठी एमएच-34 बी डब्ल्यू-0001 ते एमएच-34 बी डब्ल्यू-9999 या क्रमांका पर्यंतची नवीन मालिका उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक मोटार वाहन धारकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून आपले आकर्षक क्रमांक शासकीय फी भरुन आरक्षित करुन ठेवावेत, असे आवाहन चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी केले आहे.