चंद्रपूर – कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाने खाजगी डॉक्टर मात्र मालामाल होत आहे याचेच उदाहरण म्हणजे शहरातील खाजगी सिटी स्कॅन चाचणी चे वाढलेले दर आज 5 ते 8 हजारांच्या घरात पोहचले आहे पण का?
कारण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन ही बंद अवस्थेत आहे.
नेहमीच बंद अवस्थेत असणारी ही मशीन आज कोरोनाच्या महामारीत सुद्धा बंदच पण का? याच उत्तर काय?
कारण म्हणजेच सध्या आरोग्य व्यवस्थाचं व्हेंटिलेटरवर गेली आहे असल्याने सिटी स्कॅन मशीन मध्ये एरर आल्याने ती बंद आहे.
परंतु मिळालेल्या माहितीनुसार मशीन ऑपरेट करणारे सुद्धा कोविड पॉझिटिव्ह आल्याने ही मशीन काही काळासाठी बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
लॉकडाऊन व जनता कर्फ्युत आपला रोजगार गमावणारे खाजगी सिटी स्कॅन चाचणी करू शकत नाही तात्काळ आरोग्य प्रशासनाने ही सिटी स्कॅन मशीन पूर्वरत सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी आरोग्य विभागाला केली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मध्ये आला एरर?
Advertisements