तीन दिवस लोटूनही कोरोना बाधितांच्या परीवारातील सदस्यांची चाचणी नाही

0
148
Advertisements

गोंडपिपरी :- येथील आरोग्य प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कोरोणा संक्रमित प्रभागांमधील कोरोणा बाधित व्यक्तीच्या परिवारातील अन्य सदस्यांची गेल्या तीन दिवसापासून अद्यापही चाचणी न झाल्याने शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ” गोंडपिंपरी ‘शहर हे हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे.

गेल्या आठवड्यात शहरात विविध प्रभागात कोरोना ग्रस्त रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशातच शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये वास्तव्यास राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ही कोरोना ची लागण झाल्याचे तीन दिवसापूर्वी निष्पन्न झाले. यानंतर नगर प्रशासनाने आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार प्रभाग 1 मधील त्या कोरोना बाधित रुग्नाचे घर केले सील केले. मात्र कुटुंब प्रमुख हा कोरोना बाधित असताना पूर्व काळजी म्हणून त्याच्या संपूर्ण कुटुंबाची व संपर्कातील व्यक्तीची कोरोना चाचणी करणे अनिवार्य असताना आरोग्य प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तीन दिवस लोटून अद्यापही त्या कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांची चाचणी करण्यात आलेली नसून संपर्कातील व्यक्ती अगदी प्रभागात राजरोसपणे फिरत आहे. यामुळे प्रभागात संपूर्ण शहरात कोरोनाचा उद्रेक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून संपूर्ण शहर हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे प्रशासन कोरोना या महामारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालवित असून दुसरीकडे मात्र प्रशासनातील हलगर्जी व बेजबाबदार अधिकार्यामुळे अनेकांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता अधिक बळावली असून प्रशासनाने याबाबत गंभीर पूर्वक काळजी घेणे गरजेचे असून यावर ठोस पाऊल उचलणे ही काळाची गरज आहे. तर यासंदर्भात गोंडपिपरी तहसीलदार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनीही संबंधित कोरोनाग्रस्त कुटुंब व प्रमुखाच्या संपर्कातील परिवार सदस्य तथा अन्य लोकांची चाचणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले असून आरोग्य विभागाच्या निष्काळजी बाबत तहसील प्रशासनानेही आश्चर्य व्यक्त केले आहे.

Advertisements

या गंभीर बाबी संदर्भात नगर प्रशासनाने आरोग्य विभागाला वारंवार कळवूनही प्रभाग एक मधील कोरोनाग्रस्त कुटुंबातील परिवार सदस्यांचे मोकाट भ्रमण सुरू असून येणाऱ्या काळात कोरोना उद्रेक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून तालुका आरोग्य प्रशासन यासाठी जबाबदार असणार आहे.
शोभा संकुलवार , उपाध्यक्ष नगरपंचायत गोंडपिपरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here