सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या स्मिता चावडा यांचा सन्मान

0
52
Advertisements

चंद्रपूर – महिलांवर होणारे अत्याचार, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी देशात, राज्यात अनेक संघटना कार्यरत आहे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतील लहान वयाच्या राज्य व देशपातळीवर अनेक सामाजिक काम करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष स्मिता चावडा यांना मदर टेरेसा वर्ल्ड पिस 2020चा पुरस्कार सामाजिक कार्याबद्दल सन्मान मिळाला आहे.
हा सन्मान नोबेल पुरस्कार विजेत्या शांतीप्रिय मदर टेरेसा यांच्या 110 व्या वाढदिवशी देण्यात आला.
स्मिता चावडा यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेत चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा यशस्वी तुरा लावला, सामाजिक क्षेत्रसाहित त्यांनी मॉडेलिंग, सौंदर्य स्पर्धेत मिसेस गुजरात, मिसेस ग्लोबल इंडिया अश्या विविध स्पर्धा जिंकून त्यांनी जिल्ह्याचा गौरव केला.
त्यांच्या सामाजिक कार्याला प्रभावित होऊन केजीएन सोसायटी सोशल सर्व्हिस व मदर टेरेसा वर्ल्ड पिस अवार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने स्मिता चावडा यांचा प्रमाणपत्र देत सन्मान करण्यात आला.

 

नुकताच सामाजिक कार्याबद्दल चावडा यांना इंडोनेशिया मधील रॉयल ऑफ अमानुबन किंगडम च्या वतीने सामाजिक कार्यबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here