जिल्ह्यात कोरोनाच्या तांडवावर जनता कर्फ्युचा उपचार

0
117
Advertisements

राजुरा : जिल्ह्यात कोरोना चे रुग्ण वाढत आहे व मृत्यू ची संख्या वाढत आहे त्यामुळे चंद्रपुर व बल्लारपूर येथे चार दिवसांचे व्यापारांनी व प्रशासनाने कडकडीत बंद पाळण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील रुग्ण संख्या अधिक क्षेत्रातील अनेक तालुका ते गावपातळीवर स्वयंस्पुर्त बंद पाळण्यात येत आहे. शासन व प्रशासन ला सहकार्य म्हणून जनता कर्फ्यू चे आयोजन राजुरा शहर व्यापारी असोसिएशन ने केले आहे.

दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे शहरातील दोन व्यक्ती कोरोना ने मृत्यू झाले आहे. राजूराच्या प्रथम नागरिक अरुण धोटे सहित काही प्रतिष्ठित व्यापारी सुद्धा संक्रमित झाले आहे. त्यामुळे संक्रमण व रुग्णाची संख्या कमी करण्यासाठी कोरोणा विषाणूची साकळी तोडणे गरजेचे आहे.

Advertisements

हा उद्देश डोळ्या समोर ठेवून राजुरा शहरातील व्यापारी असोसिएशन व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक आज उपविभागीय कार्यलय राजुरा येथे तालुका प्रशासकीय अधिकारी, ठाणेदार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शहरात बुधवार दि. 16 सप्टेंबर ते रविवार दि. 20 सप्टेंबर पर्यंत स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

शासन व प्रशासनाला सहकार्य म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर जनता कर्फ्यू चार दिवसांचा असुन या कालावधीत सर्व दवाखाने, औषधांचे दुकाने, बॅंक व दुधवितरण व्यवस्था सुरु राहणार असून सर्व किराणा दुकान, भाजीपाला व फ्रूट चे दुकाने, पान टपरी, चाय चे दुकाने, फुटपाथवरील दुकाने व इतर सर्व दुकाने बंद राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here