चिमूर शहरात 3 दिवसांचा जनता कर्फ्यु

0
137
Advertisements

चिमूर – चिमुर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता सोमवारी बालाजी रायपुरकर सभागृह चिमुर येथे उपविभागीय अधिकारी चिमुर यांचे अध्यक्षतेखाली जनता कर्फ्यु संदर्भात बैठक घेण्यात आली.
बैठकीकरीता चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भंगड़िया, तहसीलदार संजय नागतिलक, प्रभारी पोलिस नीरीक्षक मंगेश मोहोड़, वैधकीय अधीक्षक डॉ, गो,वा भगत,नगराध्यक्ष गोपाल झाड़े, उपाध्यक्ष तुषार शिंदे नगर परिषद अधीक्षक राकेश चौगुले, नगरसेवक संजय खाटिक उपस्थित होते, कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे चिमुर शहर मधे शुक्रवार, शनिवार, रविवार तीन दिवस जनता कर्फ्यू व सोमवार ते गुरुवार सकाळी 9 ते 2 मार्किट सुरु ठेवनाचा निर्णय घेण्यात आला,तसेच तालुक्यातील नेरी,भिसी, शंकरपूर,खडसंगी, जांभूळघाटात या गावातही जनता कर्फ्यु घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

चिमुर व्यापारी असोसिएशन, अखिल पत्रकार बहुउद्देशीय संस्था, चिमुर तालुका प्रेस असोसिएशन, व नगर परिषद सदस्य तसेच सर्व नगर परिषद कर्मचारी यानी या बैठकीमध्ये सूचना मांडल्या, या वेळी नेरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कामडी नगरसेवक उमेश हिंगे, छाया कंचलवार, सामाजिक कार्यकर्ते संजय कुंभारे, संजय नवघडे, उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here