चंद्रपूर – 10 सप्टेंबर पासून चंद्रपूर व बल्लारपूर शहरात नागरिक व प्रशासनाच्या सहकार्याने 13 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यु लावण्यात आला.
या 4 दिवसाच्या जनता कर्फ्युला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, या कर्फ्युचा उद्देश कोरोनाची साखळी आपल्याला तोडायची असा होता परंतु तसे काहीच झाले नाही, उलट रुग्ण संख्या या 4 दिवसात हजारांच्या वर गेली 20 च्या जवळपास नागरिकांचा मृत्यू झाला.
सध्या जिल्ह्यातील खासदार अधिवेशनासाठी दिल्लीत, पालकमंत्री मुंबईत, आमदारांना कोरोनाची बाधा झाल्याने आज ते जनसेवेत रुजू होणार आहे.
प्रशासकीय अधिकारी म्हणून खुद्द जिल्हाधिकारी गुल्हाने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज आहे.
परंतु आता रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था सुद्धा पूर्णपणे कोलमडल्या गेली आहे.
कोरोना बाधितांची संख्या जास्त मात्र डॉक्टर कमी, मनुष्यबळ कमी, बेड संख्या कमी, काही डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहे.
खाजगी व शासकीय रुग्णालयात रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे, काही दिवसांपूर्वी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी 500 बेडची व्यवस्था लवकर केल्या जाणार अशी जाहीरपणे घोषणा सुद्धा केली परंतु अजूनही त्यावर काही झाले नाही.
जिल्ह्यातील आजी-माजी नेते यांनी फक्त घोषणा केल्या परंतु आरोग्य व्यवस्थेवर पुरेसे लक्ष दिले नाही म्हणून आज चंद्रपूर जिल्ह्याची ही अवस्था झाली आहे, नागरिक फक्त डॉक्टर यांच्यावर ताशेरे ओढत असताना दिसत आहे पण या परिस्थितीचे जबाबदार कोण याचा कधी शोध घेत नाही.
प्रशासनावर अजूनही कुणाचं मजबूत नियंत्रण नाही, आज सगळी आरोग्य व्यवस्था ही राम भरोसे झाली आहे.
जनता कर्फ्यु लावायचा की नाही यावर पालकमंत्री व खासदार यांचे मतभेद समोर आले, खासदार म्हणतात की सर्वांना विश्वासात घ्यायला पाहिजे तेव्हा बाकी गोष्टी करा, बरोबर आहे खासदार साहेबांचं परंतु यामध्ये नागरिकांच्या रोजगाराच काय? जे हातावर मिळत असलेला रोजगार करतात त्यांचा या जनता कर्फ्युत विचार का केल्या गेला नाही हा उत्तर नसलेला प्रश्नच आहे.