गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“शेतकरी,शेतमजूर,कामगार,व्यवसायीकात चिंता वाढत आहे.देशाची आर्थिक सुधारणा करण्यात केन्द्र सरकार अपयशी ठरले आहे.थाली बजाओ,दिया जलाओ,घंटी बजाओ असे उपक्रम राबविल्याने समाजाची प्रगती होत नाही. “मै देश नही बिकने दूंगा” म्हणत रेल्वे,बिएसएनएल,कोल खदानी खाजगीकरण करून बलाढ्य उद्योगपतींच्या दावणीला बांधण्याचा घाट घातला जात आहे.विकासावर याचा परिणाम दिसत आहे.जनमानसांच्या हिताचे निर्णय घेणारा पक्ष “राष्ट्रवादी पक्ष” असे प्रतिपादन राकाँचे जेष्ठ नेते अँड.मोरेश्वर टेमूर्डे यांनी केले.ते कोरपना येथे आयोजित राष्ट्रवादी पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.यावेळी महिला राकाँ जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके,राकाँचे जेष्ठ नेते दिपक जैस्वाल,राजूरा विधानसभा प्रमुख माजी जिप सभापती अरूण निमजे,गडचांदूर न.प.उपाध्यक्ष शरद जोगी,रसीका ढवस यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नुकतेच राकाँ मध्ये प्रवेश घेतलेले सैय्यद आबीद अली यांच्या नेतृत्वात अरविंद तिरसट,रामजी टेकाम,सुनील टोंगे,सोनू तिखट,नसीम शेख,महादेव पेंदोर,संजय सिडाम,जगदीश कोवे,अंकूश भुसारी,नागेश बांदरकर,बबन कोरांगे,सतोष माणूसमारे,सागर मरस्कोल्हे,अंकुश सौदागरे,मारोती खापने,नादीर कादरी,तेजराव भोयर, मारोती मोडक,भाऊराव डाखरे,दिनेश झाडे,सलमान खान,विजय भगत,चंद्रभान तोडासे,खुशाल राठोड यांच्यासह विविध पक्षांच्या 21 गावातील आजी-माजी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी पक्षाची घडी बांधली.लवकरच विविध पक्षाचे नेते असंख्य कार्यकर्त्यांसह राकाँ मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती असून तालुक्यात राजकीय समीकरण बिघडणार असल्याचे चिन्ह दिसत असल्याचे मत व्यक्त होत आहे.संचालन रफीक निजामी तर आभार विनोद जुमडे यांनी व्यक्त केला.
———————-//——————–
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गापासून बचावासाठी खबरदारी म्हणून केन्द्र व राज्य सरकारने नागरिकांवर विविध नियम व अटी लादल्या आहे.गर्दी टाळा,मास्क वापरा,सोशल डिस्टंसिंग व सॅनिटायजरचा वापर करा असे आवाहन वारंवार शासनप्रशासन करीत असताना 13 सप्टेंबर रोजी कोरपना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या वेळी जिल्ह्यातील जेष्ठ नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मोठ्याप्रमाणात विविध पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश घेतला. मात्र या कार्यक्रमात कोरोना संबंधी शासनाने नेमुन दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसून आले.केवळ नेते मंडळींनाच मास्क दिसले इतरांनी मात्र याला तिलांजली दिल्याचे दिली होती.हे कितपत योग्य.यांना शासनाचे नियम लागू नाही का ? असा निर्वाणीचा प्रश्न कित्येक सुज्ञ नागरिकांनी उपस्थीत केला असून आयोजकांनी भविष्यात याकडे गंभीरतेने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.