कोरोना महामारीत सुगंधित तंबाखूचा काळाबाजार सुरूच

0
76
Advertisements

चिमूर – चिमूर तालुक्यातील नेरी येथील प्रसिद्ध नूतन किराणा स्टोअरवर दि १२ सप्टेंबर रोजी साय,५:३० वाजता दरम्यान चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड पाडली असता यात सुगंधीत तंबाखु जप्त करण्यात आले.

मजा ,ईगल, व इतर प्रकारचे सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आले असून नूतन किराणाचे मालक गुलाब कामडी याना ताब्यात घेत सुगंधीत तम्बाकू ६लाख रुपये किंमतीचा असल्याचे सूत्रांकडून अंदाज व्यक्त करण्यात येत असून चिमूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद कारवाई झाली आहे.

Advertisements

सर्वत्र कोरोना महामारीचा कहर सुरू असून या कालावधीत चिमूर तालुक्यातील नेरी येथे अनेक दिवसांपासून सुगंधित तंबाखूची विक्री खुलेआम होत असते अशी माहिती चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना (एल सी बी पथकाला )मिळाली होती परंतु आजपर्यंत त्यांना सुगंधित तंबाखू सापडले नाही नेरी परिसरात या सुगंधित तंबाखूचा गोरख धंदा बऱ्याच दिवसापासून सुरू आहे गुप्त रित्या या तंबाखुची खुलेआम विक्री होत होती परिसरात अनेक ठिकाणी हा तंबाखू जात होता आणि सर्रास विक्री होत होती परंतु सुराग मिळत नसल्याने पथक निराश होत होते .
दिनांक १२सप्टेंबर ला किराणा दुकानावर पाळत ठेवून आणि सापळा रचून अचानक सायंकाळी ५:३० वाजता एल सी बी पथकाने धाड टाकली आणि जवळपास ६ लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असा अंदाज सूत्रांनी सांगितले असून किराना व्यवसायिकाला सुगंधित तंबाखू सहित ताब्यात घेण्यात आला असून सुगंधित तंबाखु बदल कारवाई प्रक्रिया चिमूर पोलीस ठाण्यात सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here