वैद्यकीय अधिकारीसह कुटुंब कोरोना संक्रमित

0
83
Advertisements

घुग्घुस : कोरोना रुग्णाची जिल्ह्यातील वाढती संख्या ही धोकादायक होत असतांना 12 संप्टेंबर रोजी घुग्घुस येथे एकाच दिवशी तब्बल 13 कोरोना संक्रमित मिळाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.  औद्योगिक नगरी घुग्घुस येथे कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या 115 झाली आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदकीय अधिकारी त्यांची पत्नी सह चिमुकला बाळ ही संक्रमित झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील 50 पैकी 20 कर्मचारी हे कोरोना बाधीत झालेले आहे.

Advertisements

मागील 05 संप्टेंबर रोजी येथील 50 वर्षीय रुग्णसेविका ह्या संक्रमित आढळुन आल्या होत्या त्यानंतर 10 संप्टेंबर ते 15 सप्टेंबर आंतररुग्ण सेवा व OPD सेवा बंद करण्यात आलेली आहे.

घुग्घुस शहर हा औद्योगीक शहर असल्यामुळे येथे मोलमजुरी करणारे व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गरीब वर्गातील नागरिकासह प्रसूती व गरोदर महिलांच्या उपचारांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here