जिल्हा स्मार्ट ग्राम समितीकडून आदर्श ग्राम घाटकुळची तपासणी

0
65
Advertisements

पोंभुर्णा : राज्यात आदर्श ग्राम ठरलेल्या पोंभूर्णा तालुक्यातील घाटकुळ गावाची नुकतीच जिल्हा स्मार्ट ग्राम समितीकडून तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यातील तालुका स्तरावर प्रथम आलेल्या १५ गावांची जिल्हा स्मार्ट ग्राम स्पर्धेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून मूल्यमापन करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, विस्तार अधिकारी राईंचवार, ग्राम विकास अधिकारी अरुण वाकुडकर यांनी आदर्श ग्राम घाटकुळची जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम स्पर्धेअंतर्गत तपासणी केली. यावेळी पं.स.सदस्य विनोद देशमुख, पोंभुर्णाचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे, विस्तार अधिकारी कुर्झेकर, सरपंच प्रिती मेदाळे, ग्रामसेवक ममता बक्षी, अविनाश पोईनकर, मुकुंदा हासे, विठ्ठल धंदरे व पदाधिकारी उपस्थित होते. समितीने सर्व कागदपत्रांची पडताळणी करून गावाची पाहणी केली व मूल्यांकन केले.

Advertisements

जिल्हा स्मार्ट ग्राम समितीच्या स्वागतासाठी गावातील कुंभार समाजाने माती कलेतून बनवलेल्या मडक्यापासून तर केवट समाजाने मासे पकडणाऱ्या जाळे पासून स्वागत गेट तयार केला. गावातील युवा जनहित व मराठा युवक मंडळाने श्रमदानातून तयार केलेल्या चौक सौदर्यीकरणाचे समितीने कौतुक केले. गावात स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शता या स्मार्ट ग्राम निकषानुसार विकास कामे झाली असून गाव सर्व सोयी सुविधा युक्त आहे. घाटकुळ हे गाव लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या नाविण्यपुर्ण उपक्रमाने जिल्ह्यात दिशादर्शक ठरत आहे. मागील तीन वर्षांपासून घाटकुळ ग्रामवासियांनी सातत्यपुर्ण परिश्रम केले. जिल्हा स्मार्ट ग्राम समीतीच्या निर्णयाकडे आता ग्रामस्थांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

=================

हि आहे जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार स्पर्धेतील गावे

जिल्हा स्मार्ट ग्राम स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम आलेले एकुण १५ गावे जिल्हा स्मार्ट ग्राम स्पर्धेत आहे. यात पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ, चिमुर तालुक्यातील मदनापूर, कोरपना तालुक्यातील रुपापेठ, नागभीड तालुक्यातील कोटगाव, राजूरा तालुक्यातील सोनापूर, मुल तालुक्यातील पिंपरी दिक्षीत, चंद्रपूर तालुक्यातील मोहुर्ली, वरोरा तालुक्यातील चारगाव खुर्द, जिवती तालुक्यातील चिखली बुज, ब्रम्हपूरी तालुक्यातील भुज, सावली तालुक्यातील खेडी, बल्लारपूर तालुक्यातील ईटोली, सिंदेवाही तालुक्यातील भेंडाळा, गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी, भद्रावती तालुक्यातील पारोधी या गावांचा समावेश आहे. यातून जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी एकमेव गावाची निवड करण्यात येणार आहे. तालुका स्तरावर १० लाख व जिल्हास्तरावर ४० लाख रुपयाचा पुरस्कार या स्पर्धेत विजेत्या गावाला ग्रामविकास विभागाकडून मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here