गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” विषाणूने अख्ख्या जगाला वेठीस धरले असून या महामारीमुळे हजारोंच्या संख्येने निष्पाप लोकांचे बळी जात आहे.इतर ठिकाणांसह कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष तथा शहर व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रतिष्ठित किराणा व्यापारी “सुनील चिंतलवार” यांचे 12 सप्टेंबर रोजी पहाटे अंदाजे 4,30 च्या सुमारास चंद्रपूर येथे निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी दोन मुले असा परिवार आहे. एक मुलगा विदेशात तर दुसरा गडचांदूर येथे राहत आहे.सुनील चिंतलवार हे अत्यंत मनमिळाऊ,मृदभाषी असल्याने मोठा मित्र परिवार होता.त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली असून सोशल मीडियावर मित्र परिवाराकडू हळहळ व्यक्त होत आहे.काही दिवसापुर्वी येथील डॉ.घोंगे यांचे सुद्धा कोरोनामुळेच निधन झाले होते.
————————————————
“सकाळी जेव्हा सुनील भाऊंच्या निधनाची वार्ता मिळाली.विश्वासच बसला नाही.एक धष्टपुष्ट,निरोगी सर्वपरी सक्षम असे व्यक्ती.यांना फक्त वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली.सुनील भाऊ परत येणार नाही पण त्यांनी जाते वेळी आपण सर्वांना एक संदेश दिला की,तुम्हाला, तुमच्या परिवाराला,सर्वांना जर सुरक्षित राहायचे असेल तर आता निष्काळजीपणा करू नका,नियमाचे पालण करा,कोणता दिवस येईल कसा,कोण जाणतो,आम्ही पैशांच्या अहंकारात बऱ्याच चुका करतो पण आता वेळ अशी आली आहे की,पैशानेही काम करणे बंद केले आहे.राजा-रंक सब एक बरोबर झाले आहे.एकदा कोविड सेंटरमध्ये भेट द्या सर्व समजून येईल.सर्वांना माझी विनंती आहे आता तरी नियमांचे पालण करा,कामधंदा करणे गरजेचे आहे.त्यावर आपला उदरनिर्वाह आहे,हे सर्व करतांना काळजीपूर्वक करा, नियमांचे सक्तीने पालण करा हीच अपेक्षा” असा मोलाचा व आपुलकीचा सल्ला गडचांदूर येथील नगरपरिषदेत शिवसेनेचे स्वीकृत सदस्य,गडचांदूर शहर व्यापारी असोसिएशन उपाध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख धनंजय छाजेड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंतीपुर्वक नागरिकांना दिला आहे.
——————//——————————
गडचांदूरात “कोरोना” चा दुसरा बळी
Advertisements