चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

0
83
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 5568 झाली आहे. यापैकी 3086 बाधित बरे झाले आहेत तर 2416 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

शनिवारी एकूण 315 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 5 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
ज्यामध्ये अंचलेश्वर वार्ड येथील 63 वर्षीय पुरुष, वणी, यवतमाळ येथील 72 वर्षीय पुरुष, झरी जामनी, यवतमाळ मधील 48 वर्षीय पुरुष, घुटकाला तलाव येथील 54 वर्षीय पुरुष व पाचवा मृत्यू जटपुरा गेट येथील 45 वर्षीय बाधितांचा मृत्यू झाला. सर्व मृतक बाधितांपैकी काही बाधितांना कोरोनासह न्यूमोनियाचा आजार होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 60 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here