निट (NEET) च्या परीक्षेकरीता नागपुर इथे जाणाऱ्या सर्व विद्यार्थी व पालकांकरीता बसेसची व्यवस्था

0
164
Advertisements

चंद्रपुर -दिनांक १३तारखेला वैद्यकीय प्रवेश करीता घेण्यात येत असलेल्या निट (NEET) परिक्षा यदि. १३.०९.२०२० रोजी नागपूर ला होत आहे करिता चंद्रपुर जिल्हयातील अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांना या परिक्षेकरिता नागपुर हे केंद्र दिले असून विद्यार्थ्यांना कोरोना आणि जनता कर्फ्यू मुळे जायचा प्रश्न पडला असता या संदर्भात बरेच विद्यार्थ्यांच्या सोईकरीता चंद्रपुर शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना जिल्हा समन्वयक इंजि. निलेश बेलखेडे यांनी आगार प्रमुख यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केली असता त्यावेळी नागपुर ला जाण्याकरीता चंद्रपुर आगारामार्फत चंद्रपुर- नागपूर प्रवासाकरीता चंद्रपुर बसस्थानकावरून सकाळी ५:३०,६:००,६:३०या वेळेत अतिरीक्त बसेस सोडण्यात येणार आहे. तरी सदर बस सेवेचा लाभ घेण्याकरीता चंद्रपुर बसस्थानकावर दिलेल्या वेळेच्या अर्धा तासा अगोदर जाऊन विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे व या सुविधांचा लाभ घ्यावा., गरज पडल्यास विद्यार्थी व पालकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त बसेसचे नियोजन सुध्दा करण्यात येणार असून कोणाचीही गैरसोय होणार नाही अशी ग्वाही युवासेना जिल्हा समन्वयक इंजि.निलेश बेलखेडे यांना चंद्रपुर आगारामार्फत देण्यात आलेली आहे. विद्यार्थी पालकांनी एस टी महामंडळ तर्फे देण्यात आलेल्या या सुविधांचा लाभ घ्यावा व चांगल्या प्रकारे परिक्षेला समोरे जावे अश्या शुभेच्छा विद्यार्थ्यांना चंद्रपुर शिवसेना युवासेना मार्फत देण्यात आलेल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here