चंद्रपूर मनसे महिला सेनेचा कोरोना बद्दलचा तो अंदाज अखेर खरा ठरला

0
526
Advertisements

चंद्रपूर – 31 जुलै 2020 ला महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना कोरोनाचा होणार प्रादुर्भाव कमी कसा होणार यावर उपाय सुचविला होता, परंतु त्यांच्या निवेदनाची त्यावेळी दखल घेतल्या गेली नाही म्हणून आज चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 5 हजारांच्या जवळ पोहचली आहे.
31 जुलैला कोरोनाबाधितांची संख्या 509 होती, जिल्ह्यात त्यावेळी दिवसाला 10 ते 12 बाधितांची भर होत होती, कोरोनाचा प्रादुर्भाव बाहेरून येणाऱ्या व्यक्तीकडूनच जिल्ह्यात पसरला, 31 जुलैला महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांनी ई पास सेवा 1 महिन्यासाठी बंद करण्याची सूचना तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांचेकडे केली होती, त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी खेमणार यांना प्रायोगिक तत्वावर 1 महिना ही सेवा बंद करा अन्यथा आपण लवकरच 5 हजार बाधितांच्या संख्ये समोर जाऊ असा अंदाज सुद्धा त्यांना सांगितला.
परंतु प्रशासन सज्ज आहे आम्ही परिस्थिती हाताळू अशी भावना प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मनात असल्याने त्या निवेदनाची दखल घेतल्या गेली नाही.
आज तब्बल 1 महिने 15 दिवस लोटल्यावर जिल्ह्यात तब्बल 4500 बाधितांची भर झाली, आरोग्य व्यवस्था कोलमडलेल्या अवस्थेत आली आहे, आता तर होम आयसोलेशनची व्यवस्था प्रशासन करणार असल्याची माहिती आहे.
जर त्यावेळी प्रायोगिक तत्वावर सुनीता गायकवाड यांच्या निवेदनाची दखल घेतली असती तर आज कोरोनाबाधितांच्या संख्येत अशी वाढ झाली नसती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here