गडचांदूरात स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर, नागरिकांचा जीव टांगणीला

0
79
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात सध्या डेंग्यू-मलेरियाने थैमान घातले आहे.दिवसंदिवस बळींची संख्या वाढत आहे.शहरातील अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर असून स्थानिक नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांत कमालीचा आक्रोश पहायला मिळत आहे. नियमितपणे नाली सफाई,फवारणी होत नसल्याची बोंब सुरू असून अधिकारी केवळ तक्रारदारांना अश्वासनांचे लॉलिपॉप देत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.घनकचरेच्या नावाखाली लाखोंची उधळण सुरू असून कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांना सुगीचे दिवस आल्याचे आरोप होत आहे.पसरलेल्या अस्वच्छतेमूळे जीव धोक्यात येत असल्याच्या भीतीपोटी कित्येक वार्डवासी उपाययोजना करण्याची मागणी करीत आहे परंतु संबंधित विभाग प्रमुख व इतर निव्वळ अश्वासन देत असल्याचे बोलले जात आहे.आरोग्य विभाग संबंधीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या व 10 सप्टेंबर रोजी सुद्धा काही नागरिक नाली सफाई,घरकुल अशा तक्रारी घेऊन नगरपरिषदेत आले असता त्यांनी News34 प्रतिनिधीपुढे अशाप्रकारे आपली आपबीती मांडली.
“पहा व्हिडिओत”
——————–//—————–
नागरिकांची मुलाखत घेत असताना आरोग्य विभागाचे प्रमुख व कर्मचारी उभे होते.याविषयी आरोग्य विभाग प्रमुख पिदूरकर यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सरळ “मॅडम (मुख्याधिकारी)ला विचारा” असे उद्धट बोलून बाईकने निघून गेले.त्यावेळी मात्र मुख्याधिकारी मॅडम नगरपरिषदेत नव्हत्या हे मात्र विशेष.”
ऐवढ्या मोठ्या शहराची जबाबदारी यांच्यावरच असताना आरोग्य विभाग प्रमुख पत्रकाराला मुलाखत देण्यास टाळतात हे कितपत योग्य आता जिल्हाधिकारीच ठरवेल.
———————//——————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here