तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे, संघटनेतील प्रतिनिधींनी माहिती सादर करण्याचे आवाहन

0
119
Advertisements

चंद्रपूर : तृतीयपंथीय कल्याणाचा विषय समाज कल्याण विभागाकडून योग्यरीत्या राबविण्याकरिता जिल्ह्यामध्ये तृतीयपंथीयांच्या संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे, नोंदणी झालेल्या तृतीयपंथीयांची आस्थापना व तृतीय पंथीयांची नावे, शैक्षणिक पात्रता, पत्ता व भ्रमणध्वनी यांची माहिती आवश्यक आहे. त्याकरिता तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे किंवा संघटना येथील प्रतिनिधींनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधून सदरची माहिती देण्याबाबतचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

महिला व बालविकास विभागाने राज्यातील तृतीयपंथीयांच्या  कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी राज्यात तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली होती. तसेच तृतीयपंथी कल्याणाचा विषय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे हस्तांतरित झालेला आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here