चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात तसेच बल्लारपूर शहरात 10 सप्टेंबर गुरुवार ते 13 सप्टेंबर रविवार पर्यंत जनता संचारबंदीचे लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने घेण्यात आला होता.
चंद्रपूरकरांनी जनता कर्फ्युच्या पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वतः आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली, कोरोनाची साखळी रोखण्यासाठी प्रशासनातर्फे जनता कर्फ्यु संदर्भात निर्णय घेण्यात आला होता त्यासाठी जनतेची साथ महत्वाची आहे असे जिल्हाधिकारी यांनी कळविले होते.
जनता कर्फ्यूसाठी जनतेचे सहकार्य अतिशय आवश्यक आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे. त्यामुळे बाधित पुढे येत असून जनतेने मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पाॅज बटन दाबणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरात जनता कर्फ्यू करण्यात येत आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी म्हटले होते.